एक पाऊल भयभित जगण्याच्या वाटेवर....!
खरे तर माणूस हा, मृत्यूचा किनारा न कळलेल्या जीवनाच्या अज्ञात वाटेवर आनंद दाई आशेने जीवन जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतो. आणि हा..! हळुवार पावलांनी चालत येणारा मृत्यू सुध्दा कितीही जवळ असला तरी अनभिदनतेमुळे मानवी मनावरील भय आणि आनंददायी हास्य हे एकाच तराजुत तोलत असतो. परंतु आज कोरोणा या सातासमुद्रापलिकडील अनोळखी पण जीवाला घोर लावना-या अज्ञात कल्पनेमुळे आपल्याच घरात, आपल्याच माणसात रंजल्या- गाजल्या वंचीता गत संशयित जीवन जगत असताना तोंडावर हास्य व मनात काहूर ठेवून कोमेजलेल्या फुलांनं हवेत सुगंध दरवळत डुलाव तसं कावरे- बावरे होऊन जीवन जगतो आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे हे आजपर्यंत ऐकत आलो, की जो थांबला तो संपला परंतु आज काळ व हवा सोडून कुणालाच या ठिकाणी निसर्गानं अविचाराने चालायची व वावरायची परवानगी दिली नाही. सृष्टीच्या उद्यापासून व मानवी जीवनाच्या परिवर्तना पासून मानवाने आज पर्यंत निसर्ग व अबोल मुक्या प्राण्यांवर केवळ आणि केवळ तोंडाला बांधून मुस्कटदाबीची वेळ आणली होती. पर...